कोथरूड परिसरात २ जुगारी अड्डे राजरोसपणे सुरू
स्थानीक पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

पुणे : बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानंतरही शहर आणि परिसरात मटका,जुगार यांचे धंदे छुपेपणे सुरुच असल्याचे दिसून येत आहे. कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन ठिकाणी जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती ‘महाराष्ट्र मिशन’ च्या हाती लागली आहे.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @ChDadaPatil @DGPMaharashtra @CPPuneCity @PuneCityPolice
कोथरूड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये शेकडो कुटुंबांचे आर्थिक आयुष्य उध्वस्त करणारे दोन जुगार अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. मागिल काळात सदर ठिकाणी गुन्हे दाखल होऊन देखील… pic.twitter.com/IBD1ZX1foB
— Maharashtra Mission (@Maha_Mission) July 25, 2023
मंगलमूर्ती पार्क जवळ, अवंती रेस्टॉरंट अँड बार शेजारी असलेल्या दुकानामध्ये, सर्व्हे नंबर ८८/७ येथे एक जुगार अड्डा राजरोसपणे सुरू आहे.
दुसरा अड्डा पौड रोड, शीला विहार कॉलनी, गौतमी रेस्टॉरंट बार शेजारील दुकानामध्ये सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी सांगितली.
कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा सुशिक्षित, सुसंस्कृत नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असलेला भाग आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रभावाखाली असलेल्या या भागात दोन जुगार अड्डे छुपेपणे सुरू आहेत. विशेष म्हणजे कोथरूड पोलीस स्टेशन पासून काही मीटर अंतरावर हे अड्डे सुरू असून पोलिसांना त्यांची माहिती कशी नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.



