सुप्रीम कोर्टात ५ नवीन न्यायाधीशांची नियुक्ती; केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी देशामधील सर्वोच्च न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पाच नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून, केंद्रीय कायदा मंत्रालयाकडून सोमवारी सकाळी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायदा मंत्रालयाने या नावांची घोषणा केली आहे.
या न्यायमूर्तींचा आहे समावेश
१. ॲड. व्ही. मोहना (सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील – थेट बार कौन्सिलमधून नियुक्ती)
२. न्यायमूर्ती चंद्रशेखर (मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय)
३. न्यायमूर्ती शील नागू (मुख्य न्यायाधीश, पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय)
४. न्यायमूर्ती संजीव सचदेवा (मुख्य न्यायाधीश, मध्य प्रदेश उच्च न्यायालय)
५. न्यायमूर्ती अरुण पल्ली (मुख्य न्यायाधीश, जम्मू-कश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय)
सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कोलेजियम’ने केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने या नावांना मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयाला पाच नवे अनुभवी न्यायाधीश मिळाले असून, यामुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा निपटारा जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. या नवीन नियुक्त्यांमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या आता ३७ वर पोहोचली आहे.



