नवी दिल्ली

समुद्रात जीवनदान! बुडत्या जहाजावरील १४ भारतीय खलाशांना वाचवण्यात यश

नवी दिल्ली : अरबी समुद्रात ओमानच्या किनाऱ्याजवळ एक मोठी दुर्घटना घडली असून, भारतीय खलाशी असलेले ‘एमएसव्ही विराट १’ हे जहाज बुडाले. मात्र, अमेरिकन नौदलाच्या सतर्कतेमुळे आणि तत्पर प्रतिसादामुळे या जहाजावरील सर्व १४ भारतीय खलाशांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.

ओमानमधील रास अल हद्दपासून सुमारे ८० सागरी मैल अंतरावर हे जहाज बुडू लागल्याची माहिती समोर आली. संकटाची चाहूल लागताच अमेरिकन नौदलाच्या ‘पी-८’ या गस्त घालणाऱ्या विमानाने तातडीने प्रतिसाद दिला. विमानाने प्रसंगावधान राखत आकाशातूनच लाइफ राफ्ट (Life Raft) समुद्रात फेकले. हे १४ ही खलाशी सुखरूप लाइफ राफ्टवर चढले आहेत, याची खात्री अमेरिकन विमानाने केली आणि परिस्थितीवर आकाशातून लक्ष ठेवले.

संकटाचा इशारा मिळताच भारतीय नौदलाची जहाजे त्वरित घटनास्थळाकडे रवाना करण्यात आली. या मोहिमेत ‘सेंट किट्स अँड नेव्हिस’चा ध्वज असलेले ‘एमव्ही जबल अली ९’ हे व्यापारी जहाजही मदतीसाठी धावून आले. या जहाजाने आपला मार्ग बदलून घटनास्थळ गाठले. सध्या सर्व १४ भारतीय खलाशी सुरक्षित असून, बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page