शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६६ वा वाढदिवस; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘मातोश्री’वर जाऊन दिल्या शुभेच्छा!

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६६ वा वाढदिवसच्या निमित्ताने त्यांच्यावर देशभरातून आणि राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन केले आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या दोन्ही नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तूळात विशेष चर्चा रंगली आहे.
देशभरातून सदिच्छांचा वर्षाव
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देशातील आणि राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी सोशल मीडियावरील ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) पोस्टच्या माध्यमातून तसेच फोनवरून संपर्क साधत सदिच्छा व्यक्त केल्या. यामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’वर कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.



