राष्ट्रीय

कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव; इस्रायलकडून विशेष निमंत्रण

विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्र मिशन

मुंबई : फ्लायदुबईच्या विमानातील गंभीर संकटावेळी असामान्य धैर्य दाखवून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित मच्छार सध्या उपचार घेत आहेत. गंभीर जखमी होऊनही त्यांनी प्रसंगावधान राखत विमानातील संकटावर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. घटनेनंतर त्यांच्यावर अबुधाबी येथे उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन मच्छार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांच्या धैर्याचे कौतुक केले. मच्छार यांच्या धाडसामुळे देशातील प्रत्येकाला अभिमान वाटत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्मित मच्छार आणि पंतप्रधान मोदी यांना आगामी इस्रायलच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण दिले आहे. मच्छार यांच्या शौर्याचा इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर गौरव होत आहे.

या घटनेची चौकशी संबंधित यंत्रणांकडून सुरू असून विमानातील संकटामागील नेमकी कारणे आणि सहवैमानिकाची भूमिका याबाबत तपास केला जात आहे. दरम्यान, कॅप्टन मच्छार यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून आणि देशभरातून प्रार्थना केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page