गुन्हेगारीपुणे शहरमहाराष्ट्र

‘चुहा गॅंग’च्या फरार टोळी प्रमुखास अखेर अटक ! पुरंदर मध्ये पळून जाऊन बसला होता चुहा

पुणे : कात्रज आणि संतोषनगर परीसरात स्वताचे टोळीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘चुहा गॅंग’च्या अनेक महिन्यांपासून फरार टोळी प्रमुखास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पकडले. शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलांचा वापर करून त्याने टोळीची कात्रज भागात दहशत निर्माण केली आहे.

साकीब मेहबूब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान (वय २३ वर्ष, रा लुनिया बिल्डींग, चौथा मजला, कदम चाळ, संतोषनगर, कात्रज) असे त्याचे नाव आहे. त्यास निरा (ता. पुरंदर) येथे जाऊन पोलीस पथकाने अटक केली.

भा. दं.वि कलम ३०७, ३२३,१४३,१४४, १४७, १४८,१४९ तसेच आर्म अॅक्ट , तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३१ या गुन्हयातील तो आरोपी आहे. १६ फेब्रुवारी पासून तो फरार होता.

 फरार कालावधीत तो त्याचे अस्तित्व लपवून वारंवार वेगवेगळया जिल्हयांमध्ये ओळख व ठाव ठिकाण बदलून वास्तव करीत होता. माहितीदारांचे नेटवर्क सक्रीय करून तांत्रिक विश्लेषणावरून शोध घेत असताना पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश इमढेरे यांना तो निरा येथे राहत आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली.

पकडल्यानंतर पुढील कारवाईसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग व तपास अधिकारी नारायण शिरगावकर

यांच्या ताब्यात देण्यात आले. चौधरी ऊर्फ बागवान हा रेकॉर्डवरील आरोपी असून यापूर्वी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. त्या गुन्हयातून त्यास जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा कात्रज भागात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी साथीदारांची पुन्हा त्यांची टोळी तयार केली.

ही कारवाई प्रविणकुमार पाटील (अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्रीमती स्मार्तना पाटील‌ (पोलीस उप आयुक्त परिमंडळ तसेच नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक सागर भोसले, पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनव चौधरी, अशिष गायकवाड, राहुल तांबे यांच्या पथकाने सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page