गुन्हेगारी

रात्रीच्या वेळी मोबाईल जबरी चोरी करणारे येरवडा पोलीसांकडून गजाआड

पुणे : रात्रीच्या वेळी मोबाईल जबरी चोरी करणारे आरोपी येरवडा तपास पथकाकडून रंगेहात पकडण्यात आले. ३ गुन्ह्यातील मिळून दोन मोटारसायकल व ११ मोबाईल असा ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. ३० एप्रिल रोजी सायंकाळी येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक अमजद शेख व अंमलदार अनिल शिंदे यांना माहिती मिळाली की कल्याणीनगर येथील आगाखान पुलावर एकाचा जबरीने मोबाईल हिसकावून चोरी करणारे हॉटेलच्या पुढे कल्याणीनगर येथे थांबलेले आहेत. ही माहिती वरिष्ठांना कळवून पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे व अंमलदार अमजद शेख, अनिल शिंदे यांनी ३ जणांना पळून जात असताना शिताफीने पकडले. त्यांना नाव पत्ता विचारता शेख (वय २१ रा बोपाडी) व एक अल्पवयीन बालक असे असल्याचे सांगितले. त्यांनी दि. २९ एप्रिल रोजी रात्री आगाखान पुलावर फोन वर बोलत थांबलेल्या मुलाचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावला होता. त्याबाबत त्यांनी कबुली दिली. येरवडा पोलीस स्टेशन येथे २०२३ भादंवि ३९२, ३४ हा गुन्हा दाखल असल्याने व त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. तसेच ताब्यात घेतलेला रोहित रणवीरसिंग चिडार (वय २१ नगर येरवडा) व दोन अल्पवयीन बालक यांच्याकडे अधिक तपास करता त्यांनी सनसिटी, अप्पा बळवंत चौक याठिकाणी मोबाईल चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले. गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे तपास करत आहेत. ही कामगिरी रंजनकुमार शर्मा (अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग) किशोर जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग, बाळकृष्ण कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा) जयदिप गायकवाड ( पोलीस निरीक्षक गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी फौजदार अंकुश डोंबाळे, हवालदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, पोलीस नाईक अमजद शेख, आगर जगदाळे, कैलास डुकरे, किरण अब्दागिरे, प्रविण खाटमोडे, अंमलदार अनिल शिंदे व रोहिणी भोकसे, उजाता शिरसाठ व वर्षा सावंत यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page