डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून त्यांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल,” अशा शब्दात नीलम गोऱ्हे यांनी राजभवनात बाबासाहेबांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहिली.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव (कार्यभार) डॉ. विलास आठवले, अवर सचिव विजय कोमटवार, उपसभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. राजभवनात प्रोटेम विधानसभा अध्यक्षांच्या शपथ प्रसंगी डॉ. गोऱ्हे गेल्या होत्या त्याआधी त्यांनी गुलाबपुष्प अर्पण करुन बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.



