पुणे शहरमहाराष्ट्रराजकारण

हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात दाखल!

पुणे, दि. ७ : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करुन तुतारी हातात घेतली. आज इंदापूरमध्ये पक्ष प्रवेशाचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह अनेक नेते उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना चांगलाच दणका बसणार आहे.

एकीकडे हर्षवर्धन पाटील यांनी राजकीय फायद्यासाठीच शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची टीका आता महायुतीमधील काही पक्षांच्या नेत्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे इंदापूरमधल्या कार्यकर्त्यांची ही अपेक्षा होती. हा जनतेचा उठाव आहे. सर्व जातीधर्मांच्या लोकांचा हा उठाव आहे. त्यांची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात आपण प्रवेश करावा. त्यानुसार तो प्रवेश आज होतोय. माझ्यासह सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हजारोंच्या संख्येने पक्षप्रवेश करत आहोत, असे हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेशाचा निर्णय जाहीर केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page