आंतरराज्यीय ड्रग तस्करांच्या मुसक्या आवळल्या; अंमली पदार्थ विरोधी पथक एकची कारवाई
दोन कोटी २१ लाखांचे 'एम.डी' जप्त

पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखेने आंतरराज्यीय ड्रग तस्करांच्या आवळल्या मुसक्या त्यांच्याकडून २,२१,६०,००० किंमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला. आजाद शेरजमान खान (वय-३५ वर्षे, रा. पिपलखेडी, थाना बरखेड़ाकला, ता. अलोट जि. रतलाम, मध्य प्रदेश) नागेश्वर रामेश्वर प्रजापती (वय ३५ वर्षे, रा. ता. अलोट, जि. रतलाम, राज्य मध्य प्रदेश, गाव खजुरी-देवडा) व एक अल्पवयीन बालक यांचा तस्करांत समावेश आहे. स.नं. ४/१ पंढरीनगर, खराडी, या ठिकाणी सापळा रचून पोलीस थांबले. त्याठिकाणी तीन जण संशयास्पद दिसून आल्याने त्यांची अंगझडती घेतली. त्यांच्या ताब्यातून २,२१,९२,५०० किंमतीचा ऐवज त्यामध्ये १ किलो १०८ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ होता. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर २,२१,६०,००० आहे. तसेच ४ मोबाईल फोन, लाल रंगाची सॅक बॅग एक ट्रॅव्हल तिकीट जप्त करण्यात आले. चंदननगर पोलीस ठाणे येथे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, मनोजकुमार साळुंके व मारुती पारधी यांना माहिती मिळाली की, मध्य प्रदेशातील काही जण खराडी चौकातून रक्षक नगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर स्नेहदिप सोसायटी लगत मेफेड्रीन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना कळविले असता, त्यांनी तात्काळ कारवाई करावी असे आदेश दिले. चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं १८१/२०२३. एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे ) रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे- १ सुनिल पवार यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, योगेश मोहिते व संदेश काकडे यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.



