दापका गावात खंडोबाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना; यात्रा महोत्सव उत्साहात

लातूर : दापका गावातील आनंदनगर (ता. निलंगा) खंडोबा यात्रा महोत्सवात ४ डिसेंबर रोजी पहाटे मैलार येथून निलंगा येथे सकाळी ८ वाजता जिजाऊ चौक येथे खंडोबा देवाची मूर्ती आणण्यात आली. जिजाऊ चौक ते खंडोबा मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीमध्ये लहान मोठे सर्व भाविक भक्त मोठ्या मोठ्या संख्येने सामील झालेले दिसून आले.
मिरवणूक सायंकाळी चार वाजता खंडोबा मंदिर येथे जाऊन पोहोचली. त्यानंतर वेदमूर्ती गुरु भक्त मनोज महाराज (लांबोटकर) यांनी पहाटे ३ ते ६ जलदिवास पूजा, पाठ होम हवन आणि अभिषेक अशा विविध विधी पूर्ण केले. ६ डिसेंबरला मैलारचे मुख्य पुजारी – मलिकार्जुन हिरेवाघे (खंडोबा देवस्थान मैलार) यांच्या हस्ते पहाटे सहा ते सात या वेळेत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मूर्ती स्थापनेनंतर तपोनिधी परम आदरणीय १००८ परमहंस श्री महंत छत्रगी गिरी महाराज ( बामणी) यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता कळसाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सर्व भाविक भक्तांसाठी मंडळातर्फे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेतला.
८ डिसेंबरला दुपारी दोन वाजता खंडोबा देवाचे लग्न लावून भव्य पालखी मिरवणूक खंडोबा मंदिर ते शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आली. येथून परत खंडोबा मंदिरात पालखी आणण्यात आली. भव्य आरती झाली. आरती नंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
२८ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत खंडोबा देवाचा महोत्सव साजरा करण्यात आला. तसेच रोज महाप्रसादानंतर वाघे मुरळी आराधी भजन करी मंडळ यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला. अशा पद्धतीने पूर्ण खंडोबा मंदिराचा यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते विश्वंभर बाजके, महेश यंदे, संदीप वाघमारे, संग्राम म्हेत्रे, आकाश हसवले, मनोज कांबळे, सचिन पिडले, बबलू होगले, बालाजी धुमाळ, संजय घाडगे, संजय धुमाळ, पिंटू मदने तात्या माळी, घाडगे दाजी, शिवाजी वाघमारे व समस्त आनंदनगर दापका मित्रपरिवार यांनी मोठे सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.



