जळगाव

दिवाळीआधी चांदीच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ, सोन्यानेही गाठला उच्चांक

जळगाव : दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. मार्केटमध्ये चांदी शिल्लक नसल्याचे दरवाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ रेट धोरण व अमेरिकन बँकांचे व्याजदार कमी झाल्याचा चांदीच्या दरात परिणाम झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जीएसटीसह चांदीचे दर हे १ लाख ८५ हजार आहेत, सोन्याचे भाव (जीएसटीसह) १ लाख २८ हजार रुपयांवर आहेत.

आठवड्याच्या शेवटी दिवाळीला सुरुवात होणार आहे. यापूर्वी सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारात सोन्यापाठोपाठ चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेले आहेत. चांदीच्या दरात मागील आठ दिवसांमध्ये २५ हजार रुपयांची मोठी भाववाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या बाजारामध्ये सोन्यापाठोपाठ चांदीमध्ये ही मोठी भाव वाढ झाली असून बाजारात चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो १ लाख ८५,००० वर जाऊन पोहोचले आहे आठ दिवसांमध्ये चांदीत २५ हजार रुपयाची मोठी भाव वाढ झाली असून दिवसेंदिवस चांदी ही वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ रेट धोरण व अमेरिकन बँकांचे व्याजदर कुठेतरी कमी झाले असून गुंतवणूकदार हे सोन्या-चांदीकडे वळल्यामुळे सातत्याने भाववाढ होत आहे.

इंडस्ट्रियल झोनमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने देखील चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ होत असताना पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page