राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे जिल्हा परिषदेत ४० जागांवर बाजी

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा ठरला असून या पक्षाने तब्बल ४० जागांवर बाजी मारत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. भाजप – ७ शिवसेना – ४, ठाकरे गट – ३ काँग्रेस – ० असे चित्र आहे.
दरम्यान इतिहासात प्रथमच काॅंग्रेसचा एकही उमेदवार जिल्हा परिषदेवर निवडून आलेला नाही. शरच्चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समिती जागांसाठी शनिवारी सकाळी मतदान झाले. जिल्हा परिषद आणि ४,८१४ पंचायत समिती जागांसाठी २,६२४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी १८५ जिल्हा परिषद जागांसाठी भाजपने आघाडी घेतली आहे. शिवसेनेला १०७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ९७ जागा मिळाल्या आहेत. काॅंग्रेसला ४२ जागांवर आणि शिवसेना ठाकरे गटाला २६ जागांवर यश मिळाले आहे. राष्ट्रवादी शप गटाला १५ आणि इतर २६ असे चित्र आहे.
निवडणुकीसाठी एकूण २५,४७१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती.१.२८ लाखांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर तैनात आहेत.१२५ निवडणूक अधिकारी आणि १२५ सहाय्यक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी २,६२४ उमेदवार आहेत. राखीव जागांमध्ये महिलांसाठी ३६९, अनुसूचित जाती (एससी) साठी ८३, अनुसूचित जमाती (एसटी) साठी २५ आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) साठी १९१ जागा आहेत. पंचायत समिती निवडणुकीसाठी ४,८१४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महिलांसाठी ७३१ जागा, अनुसूचित जाती (एससी) साठी १६६, अनुसूचित जमाती (एसटी) साठी ३८ आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) साठी ३४२ जागा राखीव आहेत.
ही स्पर्धा ७३१ जिल्हा परिषद आणि १,४६२ पंचायत समिती जागांसाठी आहे. एकूण २ कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. १२ जिल्ह्यांमध्ये ७३१ जिल्हा परिषदा आणि १,४६२ पंचायत समिती जागांसाठी मतदान झाले. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर यांचा समावेश आहे.



