मुंबई

सावधान! अनधिकृत एजंटला बळी पडू नका; HSRP प्लेटसाठी ३० जूनची डेडलाईन

मुंबई : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांच्या मालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसविण्याची मुदत आता ३० जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली असून, वाहनधारकांची होणारी गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, १ जुलै २०२६ पासून सर्व वाहनांना HSRP प्लेट असणे अनिवार्य असेल. या मुदतीनंतर ज्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट दिसणार नाही, त्यांच्यावर परिवहन विभागाकडून नियमानुसार कडक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

परिवहन मंत्र्यांनी वाहनधारकांना आवाहन केले आहे की:

वाहनधारकांनी केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करावी. नंबर प्लेटसाठी आगाऊ वेळ (Appointment) निश्चित करावी. बाजारातील कोणत्याही अनधिकृत एजंटच्या भूलथापांना किंवा आमिषाला बळी पडू नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page