गुन्हेगारी

बीड हादरलं! विवाहितेला घरातून उचलून नेत अत्याचार; चावडीवर रात्रभर बांधून ठेवलं

पोलीस पाटील, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याचे महिला आयोगाचे आदेश

बीड : जिल्ह्यातील हिवरा पहाडी येथे एका अल्पवयीन विवाहीत मुलीला घरातून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी याने पीडितेचे अपहरण करून नदीपात्रात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिला रात्रभर गावच्या चावडीवर बांधून ठेवले.

या अमानवीय घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

या घटनेची माहिती मिळताच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तपास अधिकारी अतुलकुमार लांडगे यांच्याशी संपर्क साधून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. तपासादरम्यान पीडिता अल्पवयीन असताना तिचा बालविवाह झाल्याचेही उघड झाले. त्यामुळे बालविवाह लावून देणारे, लग्नाला उपस्थित असलेले लोक तसेच कर्तव्यात कसूर करणारे स्थानिक पोलिस पाटील आणि ग्रामसेवक यांच्याविरोधातही गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी वैभव पटेकर याला भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page