पिस्तुल्या महाराज’ वर करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप

लातूर: लातूरमधील किशोर महाराज शिवणीकर, ज्यांना ‘पिस्तुल्या महाराज’ म्हणून ओळखले जात आहे यांच्यावर ‘वारकरी महाकुंभ’ आणि ‘अखंड हरिनाम सप्ताहा’च्या नावाखाली करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला आहे.
२१ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या काळात झालेल्या धार्मिक सोहळ्यात जमा झालेली दीड ते दोन कोटी रुपयांची देणगी महाराजांनी लंपास केल्याचा दावा गावकरी आणि वारकऱ्यांनी केला आहे.
नाव ‘पिस्तुल्या’ का?
महाराजांचे सोशल मीडियावर पिस्तूलसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांना हे नाव देण्यात आले. खंडापूर (लातूर) येथे या प्रकरणामुळे तणावाचे वातावरण असून गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, काही दिवसांच्या गायब होण्यानंतर किशोर महाराजांनी समोर येत हे आरोप फेटाळले असून, आपल्याकडे असलेल्या बंदुकीचे फोटो हे केवळ शिकारीच्या संदर्भातील किंवा शेतातील संरक्षणासाठीचे असल्याचे म्हटले आहे.



