सातारा

वयाच्या ८५ व्या वर्षी, शरद पवार पुन्हा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष

सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार ( वय ८५) यांची पुन्हा एकदा निवड झाली असून सन २०२६ ते २९ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी शरद पवार हेच रयत संस्थेचे अध्यक्ष असणार आहेत. संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान अध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दीर्घकाळापासून या प्रतिष्ठित संस्थेचे अध्यक्षपद ते सांभाळत आहेत.

राज्सभेवरील निवडीनंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेल्या पवार यांनी शनिवारी रयत शिक्षण संस्थेतील निवडणूक झाल्यानंतर भाषणही केले. ते म्हणाले ”आधीच्या बैठकीत मी आग्रह केला होता, जग बदलत आहे. नवी संकल्पना जगान स्वीकारली आहे, आपण देखील ती स्वीकारायला हवी. एआय स्वीकारून रयत संस्था जगाबरोबर न्यायला पाहिजे.”

यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृती मोठ्या प्रमाणात देणार आहोत. हितचिंतकांकडून संस्थेला मोठी देणगी मिळाली आहे, त्याचे आम्ही आभार मानतो. संस्थेत नवीन काही करण्यासाठी चर्चा झाली आहे. परदेशात ज्या संस्था आहेत, त्याच्यासोबत रयत जोडून मुला-मुलींच्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न आहे, असेही पवार यांनी सांगितले.

सर्वसामान्य लोकांसाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आदर्श दिला, तोच आदर्श आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. संस्थेसाठी अखंड काम करणारे आहेत, म्हणून आज संस्थेची उंची वाढली आहे, असे सांगून सेवकांचे मी अंतःकरणापासून आभार मानतो, अशा शब्दांत त्यांनी निवडीनंतर आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page