नाशिक

फरार असलेल्या कल्पना खरातचा शोध सुरुच

रुपाली चाकणकर यांची ६ तास चौकशी 

नाशिक: अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या वादग्रस्त माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाने (एसआयटी) सलग सहा तास चौकशी केली असून खरातशी संबंधित तक्रारींमध्ये महिला आयोग अध्यक्षपदी असताना पोलिस तपासात केलेला हस्तक्षेप या संदर्भात त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान चाकणकर यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित होते.

रूपाली चाकणकर रविवारी सकाळी पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या होत्या. यावेळी त्यांनी वाटेत तीन ते चार वेळा वाहन थांबविल्याची तसेच गाडी बदलल्याची माहिती समोर आली. दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेसहापर्यंत महाराष्ट्र पोलिस अकादमीतील एसआयटी कार्यालयात ही चौकशी पार पडली. एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते व उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत पथकाने चाकणकर यांना अनेक प्रश्न विचारले. अशोक खरातच्या संस्थेच्या विश्वस्त मंडळावर सलग दोन वेळा सदस्य राहिल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

अशोक खरातचे पाय धुतानाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अहिल्यानगरमध्ये खरातशी संबंधित असलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिस यंत्रणेच्या तपासामध्ये हस्तक्षेप करणे तसेच महिला आयोगाच्या पदाच्या माध्यमातून खरातला मदत करणे, यासंदर्भात त्यांच्यावर आरोप झालेले आहेत.

दरम्यान, अशोक खरात विरोधातील महिला अत्याचार व फसवणुकीच्या एकूण नऊ गुन्ह्यांमध्ये एसआयटीकडून पुढील आठवड्यात दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक खरातला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, फरार असलेल्या त्याच्या पत्नीचा, कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page