मुंबई

विधानभवन दुमदुमले! विधानपरिषदेच्या १० नव्या शिलेदारांनी घेतली शपथ

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित १० सदस्यांचा शपथविधी सोहळा आज विधानभवन परिसरात उत्साहात पार पडला. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या सर्व नवनिर्वाचित सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

या शपथविधी सोहळ्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी शपथ घेतली. तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वाधिक ६ सदस्यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली, ज्यामध्ये डॉ. प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे.

विरोधी पक्षातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झिशान सिद्दीकी यांनीही आज विधानपरिषद सदस्य म्हणून आपल्या कारकिर्दीची अधिकृत सुरुवात केली.

वया १० सदस्यांच्या समावेशामुळे आता विधानपरिषदेतील कामकाजाला अधिक गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे नेते आणि नवनिर्वाचित सदस्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page