मुंबई

प्रदेश काँग्रेसच्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग प्रमुखपदी ॲड. पल्लवी रेणके यांची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती सेल’चे रूपांतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग’ असे करण्यात आले असून काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून ॲड. पल्लवी रेणके यांची विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किमान ११ टक्के आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या हेतूने समाजातील या अतिदुर्लक्षित व वंचित समाज घटकाला न्याय मिळण्यासाठी काँग्रेस पक्षाने राज्याच्या निर्मितीपासूनच या समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देऊ केले आहे. परंतु कडकलक्ष्मी, वैदू, गोंधळी, जोशी, वासुदेव, बहुरूपी, भराडी, डोंबारी, टकारी, रामोशी, लमाण या व अश्या सुमारे ४० जमाती आजही त्यांच्या पारंपरिक भटकंती व व्यवसायामुळे संघटित झालेल्या नाहीत. तसेच विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकलेल्या नाहीत. अशा विखुरलेल्या व वंचित समुदायास संघटित करण्याचा निश्चय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतला आहे. या कामाचे महत्त्व जाणून काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाला बळकटी देण्याचे ठरविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page