Uncategorizedगुन्हेगारीपुणे शहर

उस्मानाबादमध्ये खून करणारा पुण्यात गजाआड गस्तीवरच्या मार्केट यार्ड पोलिसांनी पकडले

पुणे : उस्मानाबाद मध्ये खून, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यामध्ये पोलिसांना पाहिजे असलेला अशोक उर्फ बप्पा उर्फ खाऱ्या रामराजे पवार (वय २६, रा.गांधी नगर, ता कळंब जिल्हा उस्मानाबाद) यास मार्केट यार्ड पोलिसांनी गस्ती दरम्यान संशयावरून ताब्यात घेऊन उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले.

शिराढोण पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम ३०२,३६४,३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८ आदी गुन्हे पवार याच्यावर दाखल होते. गस्तीवर असलेल्या मार्केट यार्ड पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांनी त्याची संशयास्पद अवस्थेत चौकशी केली. तगुन्हा केल्याचे कबूल केले . त्यास पुढील कारवाई कामी स्थानिक गुन्हे शाखा,उस्मानाबाद यांचे ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, शाहुराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, गुन्हे निरिक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे , नाईक किरण जाधव, दिपक मोधे, अंमलदार आशिष यादव, मोहन झायटे, सीताराम गायकवाड, सुधीर खुटवड यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page