महाराष्ट्रमुंबईराजकारण

सद्यकालीन राजकारणाला कंटाळून नवा पक्ष स्थापन करणार, अंजली दमानिया यांची घोषणा

नागपूर : एकेकाळी आप सारख्या पक्षाला कंटाळून त्यातून बाहेर पडणा-या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता नवा पक्ष स्थापण करणार अशी घोषणा केली आहे. महाराष्ट्राची निवडणूक संपली आहे. परंतू निकलानंतरची परिस्थिती काय आहे. पक्ष फोडणे, पैसे वाटणे हे सर्व पाहून सध्याचे राजकारण हाताबाहेर जात आहे. त्यासाठी एक पक्ष स्थापन करायचा निर्णय घेतला आहे. लवकरच पक्षाचे नाव आणि चिन्हं अशा गोष्टीचा निर्णय घेण्यात येईल असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

आम्हाला विधान सभेत मिरवायची हौस नाही. पक्षात इतकी वर्षे काम करणारी लोकं या पक्षातून त्या पक्षात जात असतील, तर आम्हाला महाराष्ट्राचे राजकारण सुधारायचे आहे. आज देशाला चांगल्या शिक्षणाची गरज आहे. आपण राजकीय पक्ष यासाठी काढत आहोत असे अंजली दमानिया यांनी सांगितले. राजकीय पार्टी बनविण्यासाठी आज आपण पहिली बैठक झाली आहे. यावेळी पक्षाची भूमिका मांडताना हा पक्ष शेतक-यांचा, ऊस तोड कामगारांचा असणार आहे. तरुणांना बरोबर घेऊन सोशल मीडियाचा वापर करून तरुण लोकांना सोबत घेऊन आपला पक्ष सिद्धांतांवर राजकारण करेल असेही अंजली दमानिया यांनी यावेळी सांगितले.

आपण आधी भारतीय आहोत

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण काय आहे याचे व्हिजन आम्ही सर्व लोकांपुढे आणू, दरवेळी जातीचे कार्ड काढले गेले हा देश प्रगतीच्या मार्गांवर न्यायचा असेल तर रस्त्यात उतरताना आपण आधी भारतीय आहोत हे लक्षात घेतले पाहीजे. सध्या राजकीय पक्षांना चाप बसायला हवा. त्यांना आमच्या पक्षाकडून राजकारण कसे असते हे कळेल. देशाला पुढे नेणारे तळमळीचे लोक या पक्षात असतील असेही अंजली दमानिया यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page