वारकऱ्यांना टोलमाफी, शासनाकडून निर्णय जारी

पुणे : वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. १८ जून ते १० जुलै दरम्यान वारकऱ्यांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. १० मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १८ जून ते १० जुलैदरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार आहे. १० मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयानुसार टोल नाक्यावर वारकरी, मानाच्या पालख्या आणि भाविकांना टोलमाफी मिळणार आहे. जड आणि हलक्या वाहनांना या टोलमाफीचा फायदा होणार आहे. यामुळे वारकऱ्यांना आता या मार्गावर कुठलाही टोल भरावा लागणार नाहीये, वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.



