जम्मू काश्मीरनवी दिल्लीमुंबईराष्ट्रीय

देशातील २५ टोल प्लाझा हटणार, मल्टीलेन फ्री टोलची प्रणाली सुरु करण्याची योजना 

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देशाच्या २५ नॅशनल हायवेवरुन टोल प्लाझा समाप्त करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे ट्रॅफीक जाममधून सुटका होऊन टोल प्लाझावरील कोंडी टळणार असून, आता वाहनांचा मुक्त प्रवास सुरु होणार आहे. यात आता मल्टीलेन फ्री टोलची (एमएलएफएफ) प्रणाली सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे. एमएलएफएफ योजनेचा मुख्य हेतू टोल महसुलीत सुधारणा आणि देशभरात स्मार्ट गती आणि अधिक कुशल हायवे नेटवर्क उपलब्ध करणे हा आहे.

मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग एक विना व्यत्यय टोलिंग प्रणाली आहे. ही उच्च दर्शन आरएफआयडी रिडर्स आणि एएनपीआर कॅमे-यांद्वारा फास्टॅग आणि वाहन नोंदणी संख्येला (व्हीआरएन) मोजून देवाण-घेवाण सक्षम बनवते. एकदा ही योजना लागू झाल्यानंतर मल्टी-लेन फ्री फ्लो प्रणाली टोल प्लाझावर वाहनांना न थांबवता विना व्यत्यय टोल संग्रह प्रदान करण्यात येणार आहे.

या योजनेमुळे गर्दी आणि प्रवासाचा वेळ कमी करणार आहे. ज्यामुळे इंधन दक्षतेत वृद्धी होणार आणि प्रदूषणात कमी होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एका प्रेस रिलीजमध्ये सांगितले की, एनएचएआय चालू आर्थिक वर्षांत सुमारे २५ राष्ट्रीय महामार्गावर टोल प्लाझावर एमएलएफएफ आधारित टोल व्यवस्था सुरू करण्याची योजना आखत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page