गुन्हेगारी

चंदननगर पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी गजाआड 

पुणे : खुनाच्या प्रयत्नात सुफियान शब्बीर खान, (वय २४, रा. जिनेश शाळे शेजारी, खांदवेनगर) यास चंदननगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. सहा महिन्यापासून तो फरार होता.

१९ जून रोजी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन हदीत पेट्रोलींग करीत होते. पोलीस अंमलदार गणेश हांडगर यांना माहिती मिळाली की, नागपाल रोड चंदननगर पुणे समोरील मैदानामध्ये येथे एक जण संशयास्पद अवस्थेत उभा आहे. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पाहणी केली असता सुफियान स्टाफला पाहताच तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. स्टाफने त्यास शिताफीने जागीच पकडून चौकशी केली.

सुफियान तडीपार होता. चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ४४७/२०२२ भादंंवि कलम ३०७, १२०(ब) सह क्रिमीनल लॉ अॅमेन्टमेन्ट अॅक्ट कलम ३७ अन्वये दाखल गुन्ह्यात तो फरार होता.

ही कामगिरी पोलीस उपआयुक्त परीमंडळ ४ शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपनिरीक्षक अरविंद कुमरे, व दिलीप पालवे, पोलीस अंमलदार सुहास निगडे, सचिन रणदिवे, अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, शिवाजी घाडे, महेश नाणेकर, अनुप सांगळे, नामदेव गडदरे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, शेखर शिंदे, सुभाष आव्हाड, विकास कदम, गणेश हांडगर यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page