पुणे शहर

इंद्रायणीचा काठ स्वच्छतेने न्हाला! जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांच्या ४ हजार भक्तांकडून आळंदीत भव्य स्वच्छता मोहीम

आळंदी (प्रतिनिधी) : जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि अखिल भारतीय हिंदू संग्राम सेनेच्या वतीने तीर्थक्षेत्र आळंदी (पुणे) येथे पवित्र इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाला शनिवार, दिनांक २३ मे २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या भव्य मोहिमेत मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांतून ४००० हून अधिक भाविक, संग्राम सैनिक आणि सेवाभावी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अभियानाची सुरुवात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून, तसेच पवित्र इंद्रायणी नदीचे विधिवत पूजन करून करण्यात आली. पवित्र इंद्रायणी नदी स्वच्छ, निर्मळ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या अभियानात अडीच हजारांहून अधिक संग्राम सैनिक व भाविक प्रत्यक्ष मैदानावर उतरले होते. शनिवार सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच या उपक्रमाला गती आली. यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता, ज्यांनी पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकी जपत या अभियानात हिररीने भाग घेतला.

नागरिकांमध्ये जनजागृती आणि कचऱ्याची विल्हेवाट

या अभियानाच्या माध्यमातून केवळ नदी स्वच्छ करणे हाच उद्देश नसून, नागरिकांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नदी संरक्षणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नरेंद्राचार्यजी महाराजांच्या भक्तांनी अवघ्या काही तासांत नदी परिसरातून हजारो टन कचरा आणि जलपर्णी बाहेर काढली. गोळा केलेल्या या कचऱ्याची आळंदी नगरपालिकेच्या सहकार्याने योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली.

या व्यापक सामाजिक उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने शेखर मानकर (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदू संग्राम सेना) सिद्धेश्वर कोळी (लेफ्टनंट जनरल, पश्चिम महाराष्ट्र, अखिल भारतीय हिंदू संग्राम सेना) रविभाऊ लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका) प्रशांत दादा कुऱ्हाडे (नगराध्यक्ष, आळंदी नगरपालिका) सौ. सुजाता ताई कालिदास तापकीर (उपनगराध्यक्षा, आळंदी नगरपालिका) बाळकृष्ण स्वामी महाराज (डिस्कळ, ता. खटाव, जि. सातारा) अनुराग जैध (सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती, खेड गणेश सस्ते (उद्योजक, मोशी) तसेच नगरसेविका साक्षीताई कुऱ्हाडे, नगरसेवक कालिदास तापकीर, सोमनाथ कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे, उद्योजक संकेत कुऱ्हाडे, निसार सय्यद आणि कामगार नेते अरुण गुंडरे यांसह अनेक स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नगरसेविका साक्षीताई कुऱ्हाडे, नगरसेवक कालिदास तापकीर, सोमनाथ कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे, उद्योजक संकेत कुऱ्हाडे, निसार सय्यद आणि कामगार नेते अरुण गुंडरे यांसह अनेक स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page