मुंबई

गुटखा माफियांवर आता ‘मकोका’चा बडगा; अन्न व औषध प्रशासनाचे राज्यभरात कडक आदेश

मुंबई : महाराष्ट्रात गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाला यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, आता या व्यवसायातील संघटित गुन्हेगारीला रोखण्यासाठी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका) लागू केला जाणार आहे.

या मोहिमेला अधिक बळ देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश जारी केले आहेत. यानुसार, गुटख्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्या संपूर्ण संघटित नेटवर्क्सविरुद्ध मकोका अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या निर्णयामुळे अवैध गुटखा व्यवसायात गुंतलेल्या माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page