गुन्हेगारीमहाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक

अर्णवच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कुणाचीही खैर नाही : एकनाथ शिंदे 

डोंबिवली : निरागस अर्णवच्या मृत्यूस जे कुणी जबाबदार आहेत, त्यांना सोडणार नाही, त्यांची गय केली जाणार नाही. मग ते कुणीही असोत. या प्रकरणाचा तातडीने तपास केला जाईल व कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी खैरे कुटुंबाला दिले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी शिंदे गटाचे कल्याण/उल्हासनगर विधानसभा क्षेत्रप्रमुख महेश गायकवाड यांच्या माध्यमातून खैरे कुटुंबीयांशी व्हीडीओ कॉलद्वारे संवाद साधला. योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. तुमच्या दु:खात आम्ही पूर्णपणे सहभागी आहोत, असे सांगत खैरे कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धीर दिला.

अर्णवच्या मृत्यूला जे कुणी जबाबदार आहेत, त्यांचा लवकर शोध घेतला जाईल. त्यांना अटक करण्याच्यादृष्टीने पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खैरे कुटुंबीयांना आश्वस्त केले.

संपलेला आपलं राजकारण आपलं सुरु राहावं यासाठी भाषावाद 

अमित साटम म्हणाले की, भाषा भाषांमध्ये वाद काही पक्ष करत आहेत. यामध्ये मराठी तरुणाला जीव गमवावा लागला. संपलेलं राजकारण आपलं सुरु राहावं यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत. काही पक्ष काही नेते हे राजकारण करत आहेत. त्यांना सुबुद्धी देवो यासाठी आम्ही येथे एकत्र आलो आहोत. माणसाने माणसाला माणसासम वागू द्या. बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावरुन या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना सुबुद्धी द्यावी, असे सांगितल्याचे ते म्हणाले. माणसाने माणसाला माणसासम वागू द्या, असे साटम म्हणाले. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात अर्णवच्या वडील जितेंद्र यांनी जबाब नोंदवला असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी अर्णवच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अर्णवच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या घटनेचा सखोल तपास करून या प्रकरणी मराठी तरुण आहेत की मराठी याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण 

मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे अर्णव अंबरनाथ–सीएसटी लोकलने कॉलेजकडे निघाला. मात्र त्याच्यासाठी ती सकाळ शेवटची ठरली. फोनवरून वडिलांना सांगताना अर्णवने सांगितलेली हकिगत अंगावर काटा आणणारी होती. लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे एका मुलाला तो थोडं पुढे व्हा असं म्हणाल्यावर त्या मुलाशी बोलण्यावरून किरकोळ वाद झाला आणि अचानक ४–५ जणांच्या टोळक्याने अर्णववर झडप घातली. त्या टोळक्याने अर्णवला विचारणा केली. तू मराठी बोलत नाहीस का ? मराठी बोलण्याची लाज वाटते का ? असे म्हणत त्या टोळक्याने अर्णवला ठोसा-बुक्क्यांनी मारहाण केली. अर्णवला मारहाण होत असताना लोकलमधील बघ्यांपैकी कुणीही मधे पडला नाही. हा सारा प्रकार अर्णवने त्याच्या वडिलांना फोन करून सांगितला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page