महाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर शेवटची तारीख 

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील लाखो महिला सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे पैसे अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत, ज्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रक्रियेसाठी फक्त काही दिवस उरले असून, ३१ डिसेंबरपूर्वी या प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ बंद होण्याची गंभीर शक्यता आहे. अद्याप किमान ४० लाख महिलांनी ही प्रक्रिया अपूर्ण ठेवली आहे, आणि त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात.

या पार्श्वभूमीवर राज्य महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील महिलांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ निरंतर चालू राहण्यासाठी, लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. नववर्षाच्या सुरुवातीला ३००० रुपये किंवा तीन महिन्यांचे एकत्रित ४५०० रुपये खात्यात जमा होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे, पण यासाठी या प्रक्रियेची पूर्तता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ही शेवटची संधी : तटकरे

राज्य सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ची शेवटची तारीख निश्चित केली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना सांगितले की, ही शेवटची संधी आहे. आपला हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करा आणि तुमच्या लाभाचा हक्क कधीही गमवू नका. सरकारने या योजनेतील आर्थिक लाभ महिला सबलीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरवले आहेत. लाभार्थ्यांना या योजनेचा फायदाही मिळावा यासाठी योग्य मार्गदर्शन आणि तांत्रिक पूर्तता अनिवार्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page