आंतरराष्ट्रीयराष्ट्रीय

भारतातील हजारो लोक युद्धभूमीत अडकले; महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आणि पर्यटकांचा समावेश

नवी दिल्ली : इराणकडून दुबईसह इतरही अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत. भारतातील हजारो लोक युद्धभूमीत अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आणि पर्यटकांचा समावेश आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. यासोबतच महाराष्ट्रातील ४० ते ५० हजारांपेक्षा जास्त मुस्लिम मक्का मदिना येथे अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायल आणि अमेरिका इराणवर सतत हल्ले करत आहे. इराणकडूनही या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणकडून दुबईसह इतरही अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत. भारतातील हजारो लोक युद्धभूमीत अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली असून या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सरकारकडे विनंती केली आहे.

यात पुणे येथील एका महाविद्यालयाची शैक्षणिक सहल दुबई येथे गेलेली आहे. सहलीत गेलेले ८० विद्यार्थी दुबईत अडकून पडलेले आहेत. या सहलीत हिंगोली शहरातील खुशी बडेरा या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा समावेश आहे. यासोबतच चंद्रपूरमधील शेकडो मराठी विद्यार्थी दुबई, यूएई आणि अबुधाबी येथे अडकले आहेत. दुबईच्या जेबल अली पोर्ट भागात इराणचे मिसाईल हल्ले भागात होत आहेत. या हल्ल्यांमुळे या भागात वास्तव्याला असलेले विद्यार्थी भयभीत झाले आहेत. यासोबतच आखाती देशात कोल्हापुरातील जवळपास १५० लोक अडकले आहेत.

यासोबतच महाराष्ट्रातील ४० ते ५० हजारांपेक्षा जास्त मुस्लिम मक्का मदिना येथे अडकल्याची माहिती समोर आली आहे. ‘उमरा’ या धार्मिक विधीसाठी गेलेले लोक इराण आणि इस्राईल युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावात अडकले आहेत. तेथे अडकेलल्यांनी त्वरीत भारतीय दुतावासाशी संपर्क करावा, असे आवाहन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page