राष्ट्रीय

पश्चिम बंगालसह ५ राज्यात निवडणूक जाहीर 

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी यांची निवडणूक जाहीर झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग यावेळी मतदानाचे टप्पे कमी करण्यावर विचार करत आहे. २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात मतदान झाले होते, मात्र यावेळी हे टप्पे कमी करण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांची मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात येणार आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी आणि निष्पक्ष मतदानासाठी सुरक्षा कडक केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करताच संबंधित राज्यांमध्ये ‘आदर्श निवडणूक आचारसंहिता’ तात्काळ लागू होईल. या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मे आणि जून २०२६ मध्ये संपत आहे, त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचे आयोगाचे उद्दिष्ट आहे.

सर्व ५ राज्यांमध्ये अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. निवडणूक आयोगाच्या पथकांनी यापूर्वीच सर्व राज्यांचा दौरा करून सुरक्षा आणि इतर तयारीचा आढावा घेतला आहे.

कोणत्या राज्यात कधी मतदान?

आसाममध्ये एकाच टप्प्यात ९ एप्रिल रोजी मतदान होणार. तर ४ मे रोजी निकाल जाहीर होईल. केरळमध्ये एकाच टप्प्यात ९ एप्रिल रोजी मतदान होईल. ४ मे रोजी निकाल जाहीर होईल. पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर ४ मे रोजी निकाल जाहीर होतील. बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान होईल. ४ मे रोजी मतमोजणी होईल. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल आणि ४ मे रोजी मतमोजणी होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page