सिन्नर टोलनाका तोडफोड प्रकरण; मनसेच्या ८ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक

नाशिक : मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीनं वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात १५ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर वावी पोलिसांनी १४ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, आता यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली होती. या तोडफोडीमध्ये जवळपास पाच लाखांचं नुकसान झाल्याचा दावा समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला आहे.
या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी १५ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. १४ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, त्यापैकी आता आठ जणांना आता अटक करण्यात आली आहे.
अमित ठाकरेंची प्रतिक्रिया
मनसे कार्यकर्त्यांकडून टोल नाक्याची तोडफोड करण्यात आल्यानंतर अमित ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांनी उद्धट भाषा वापरली. फास्ट टॅग असूनही बराचवेळ गाडी थांबवण्यात आली, टोकनाक्यावर काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र मॅनेजरसह कर्मचारी उद्धट भाषेत बोलले असा दावा अमित ठाकरे यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की मी जेव्हा नाशिकला पोहोचलो तेव्हा मला कळालं टोल नाका फोडला. राज ठाकरे यांच्यामुळे अनेक टोलनाके बंद झाले, आता त्यात माझ्यामुळे आणखी एकाची भर पडली, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.



