कृषीमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारण

शेतकऱ्यांना ४८० कोटी रुपयांच्या वाटपास मंजुरी

मुंबई : अतिवृष्टीमुळे मराठवाडा तसेच विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी जमीन खरडून गेली तर काही ठिकाणी शेतातील उभे पीक पाण्याखाली गेले. शेतक-यांचे अभूतपूर्व नुकसान झाल्याने राज्य सरकारने त्यांना मदत करण्यासाठी ३१ हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर केली होती. सरकारने आता ४८० कोटी रुपयांच्या वाटपास मंजुरी दिली. त्यामुळे शेतक-यांच्या खात्यात दिवाळीआधाची पैसे येण्याची शक्यता वाढली आहे. कारण दिवाळीपूर्वीचपैसे वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीआधी शेतक-यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात करण्यात आली. सरकारने काढलेल्या ताज्या जीआरनुसार सरकारने काही जिल्ह्यात ४८० कोटी रुपये वाटपास मंजुरी दिली. अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम आणि संभाजीनगर विभागातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतक-यांना मदत मंजूर करण्यात आली. त्यामुळे आता मदत वाटपास सुरूवात होणार आहे. सरकारने सध्या मंजूर केलेल्या ४८० कोटी रुपयांच्या निधीमुळे काही शेतक-यांना आर्थिक मदत मिळण्यास लवकरच सुरूवात होणार आहे. निधी मंजूर झाल्यानंतर आता पुढची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतर शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

अन्य जिल्ह्यांसाठीही निर्णय जारी होणार

ऑगस्ट आणि सप्टेंबरमधल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना ही मदत केली जात आहे. येत्या काळात आणखी काही जिल्ह्यांतील शेतक-यांना मदतीसंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page