लेख : मुंबईला पुणे जोडणारा बुलेट ट्रेन कॉरिडॉर काही उपयोगाचा नाही

बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ फक्त ४८ मिनिटांवर येईल , तर पुणे ते हैदराबाद प्रवासाला सुमारे १ तास ५५ मिनिटे लागतील. याचा थेट फायदा मुंबई आणि पुणे दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना होईल. कमी प्रवास वेळेमुळे दैनंदिन प्रवास आणि व्यावसायिक प्रवासात बदल होईल,असे स्वप्न दाखवणारी बुलेट ट्रेन गेल्या ७/८ वर्षांपासून चर्चेत आहे. मूळ मुद्दा असा आहे की विमानाच्या वेगाने मुंबईला जाण्यासाठी किंवा पुण्यात येण्यासाठी किती प्रवासी उत्सुक असतात? या बुलेट ट्रेनचा वेग किती असणार आहे? आत बसलेल्या ज्येष्ठ वयीन प्रवाशांना अतिवेगाने जाणाऱ्या रेल्वेचा प्रवास करावा वाटेल का की ही बुलेट ट्रेन केवळ श्रीमंतांची सोय म्हणून पुढे आणली जात आहे? तिचा ५ हजार रुपये तिकीट दर ‘परवडणारा’ असेल असे रेल्वे मंत्री म्हणतात, तो कोणाला परडवणारा आहे?
मुंबई आणि पुणे दरम्यानचा हायवे मार्ग प्रवासाचा वेळ ४८ मिनिटांपर्यंत कमी करेल तर दुसरा मार्ग पुणे आणि हैदराबादला १ तास ५५ मिनिटांत जोडेल. हे दोन्ही हायवे मार्ग आयटी हबना जोडतील, असे स्वप्न दाखवणारी ही ट्रेन आहे. मुळात मुंबई -पुणे प्रवासाचा वेळ फक्त तीन तासांचा आहे. अशा परिस्थितीत ४८ मिनिटांवर तो आणून कोणता विकास साधला जाणार आहे?
मुंबईला पुण्याशी जोडणारी ही बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे. हा टप्पा २ मध्ये नियोजित सात नवीन कॉरिडॉरचा एक भाग आहे, ज्यामध्ये मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बेंगळुरू, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बेंगळुरू, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलिगुडी यांचा समावेश आहे.
मुंबई-पुणे हाय-स्पीड रेल (एचएसआर) रेल्वे मंत्रालयाने अंतिम केलेल्या सात नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा भाग ही बुलेट ट्रेन आहे. दुसऱ्या टप्प्यातील सात प्रस्तावित कॉरिडॉर ४,००० किमी मार्गाचा समावेश करतील आणि त्यासाठी अंदाजे १६ लाख कोटी रुपये गुंतवणुकीची आवश्यकता असेल. योजनेनुसार, भारतात एकूण ७,००० किमीचे एचएसआर नेटवर्क असेल.
बुलेट ट्रेन दर एक ते दोन तासांच्या अंतराने धावेल. एकदा ही यंत्रणा स्थिर झाली की, टोकियो-ओसाका कॉरिडॉरवरील वारंवारतेप्रमाणेच, दर १५-२० मिनिटांनी या गाड्या चालवता येतील, असे रेल्वे मंत्री सांगतात. तसेच, या गाड्यांचे भाडे “परवडण्याजोगे” असेल अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
वास्तविक, पश्चिम घाटात, खंडाळा घाटात आजही बहुतांश रेल्वेच्या गाड्यांना वेग कमी करावा लागतो. अशा परिस्थितीत बुलेट ट्रेन मुंबई-पुणे हायवे मार्गाच्या संरेखनाची निवड करण्याच्या तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. खंडाळा ही पर्वतरांगा खूप उंच आहे. पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचून जेथे लोकल रेल्वे तासनतास उभ्या राहतात, तेथे बुलेट ट्रेनची अवस्था काय होणार याची कल्पना केलेली बरी! मुंबईतून निघताना पारंपरिक रेल्वे स्टेशनवरुन बुलेट ट्रेन सुरु होणार असेल तर वेगवेगळ्या टर्मिनसवर येजा करणाऱ्या गाड्यांना सिग्नल न मिळणे ही समस्या आहे. अशा परिस्थितीत ४८ मिनिटांत बुलेट ट्रेन प्रवास होऊ शकला नाही तर रेल्वेच्या लोकांचे हसे होईलच, शिवाय, प्रवासाचा वेळ फक्त तीन तासांचा आहे, त्यामुळे विमान प्रवासाला अधिक पसंती दिली जाते. खासगी वाहने सुध्दा सुसाट वेगाने पुणे मुंबई गाठतात. त्यामुळे मुंबईला पुणे जोडणारा बुलेट ट्रेन कॉरिडॉर अर्थहीन असेल हे नक्की! शिवाय पॅसेंजर रेल्वेच्या कोंबून भरलेल्या प्रवाशांसाठी, अक्षरशः संडासात बसून प्रवास करणाऱ्यांना असा बुलेट प्रवास म्हणजे श्रीमंती असे वाटणार नाही का?
खरेतर बुलेट ट्रेनची काहीही आवश्यकता नाही; त्याऐवजी, सध्या कार्यरत असलेल्या गाड्यांची वारंवारता वाढवावी, जेणेकरून सामान्य डब्यांमधील प्रवाशांना यापुढे गर्दीचा सामना करावा लागणार नाही आणि त्यांना असहाय्य अवस्थेत राहावे लागणार नाही. हीच, खऱ्या अर्थाने, सर्वात मोठी “बुलेट ट्रेन” ठरेल.
मुळात भारतीय रेल्वेची अवस्था वाईट आहे.
रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. रेल्वे अपघात अधिक वेळा होतात आणि स्कॉटलंडमधील एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील चेंगराचेंगरीमुळे हे सिद्ध होते.
सुदीप बंदोपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील रेल्वेवरील स्थायी समितीने अलिकडच्या अहवालात म्हटले आहे की २०१४-२०१५ मध्ये ४० टक्के पेक्षा जास्त घटना मानवरहित लेव्हल क्रॉसिंगवर घडल्या आणि २०१५-२०१६ मध्ये २८ टक्के पेक्षा जास्त घटना मानवरहित लेव्हल क्रॉसिंगवर घडल्या. पटरीवरून पडून मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या कमी करण्यासाठी एलएचबी कोच पूर्णपणे पुन्हा डिझाइन करावेत, असेही पॅनेलने म्हटले आहे.
तर, युक्तिवाद असा आहे की श्रीमंतांसाठी असलेल्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याऐवजी, लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून आपल्याकडे आधीच असलेल्या पायाभूत सुविधा का ठेवू नये आणि त्या सुधारू नयेत?
सुरक्षेच्या मुद्द्यांवर विचार करणे आणि काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे यात शंका नाही. दुसरीकडे, या दोन्ही गुंतवणुकीची तुलना करणे चुकीचे आहे. याकडे इतर पर्याय म्हणून पाहू नये. तसेच, पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी हाय-स्पीड ट्रेन रेल्वे प्रणाली बांधण्यासाठी पैसे बाजूला ठेवले पाहिजेत.
भारताला अमेरिकेला मागे टाकून २० वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनायचे आहे. आता जपानने अंतराळात आपली ताकद दाखवून दिली आहे, त्यामुळे हाय-स्पीड ट्रेन रेल्वे नेटवर्क मिळवून तो आपली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा आणखी सुधारू शकेल. प्रत्येक गोष्टीत चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात. पर्यायांचा योग्य तोल करून योग्य निर्णय घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे काम आहे. तांत्रिक प्रगतीसाठी काही किंमत मोजावी लागते, परंतु आपल्या नागरिकांची सुरक्षितता ही त्यापैकी एक असू नये.



