मुंबई

साडेसात लाख वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; आरोग्य विभागाच्या कामगिरीचे कौतुक!

मुंबई/पंढरपूर : आषाढी वारी २०२६ दरम्यान राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या संकल्पनेखाली वारकरी भाविकांसाठी व्यापक आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यात आली. या मोहिमेत तब्बल ७ लाख ४७ हजार १७८ वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली असून, यात ७ लाख ४२ हजार ७३१ बाह्यरुग्ण, ४ हजार ४४७ आंतररुग्ण आणि १ हजार ६०० संदर्भ सेवांचा समावेश आहे.

वारीच्या मार्गावर तातडीच्या उपचारासाठी ३५३ रुग्णवाहिका, ६९ आयसीयू, १५६ ‘आपला दवाखाना’, तसेच ३ हजारांहून अधिक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात होते. विशेष म्हणजे, वारीच्या इतिहासात प्रथमच एअर ॲम्बुलन्स सेवा आणि ‘आरोग्यसंपन्न वारी’ हे डिजिटल वेब ॲप सुरू करण्यात आले, ज्याचा १ लाख ८ हजार ३८ भाविकांनी लाभ घेतला. या प्रभावी आरोग्य यंत्रणेमुळे वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि आरोग्यदायी ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page